रविवार, ८ मार्च, २०१५
वैभवी उवाच: पुन्हा एकदा जागतिक महिला दिन आला. जगात कोणाला काही...
वैभवी उवाच: पुन्हा एकदा जागतिक महिला दिन आला. जगात कोणाला काही...: पुन्हा एकदा जागतिक महिला दिन आला. जगात कोणाला काहीच काम न उरल्यासारखे आजकाल हे " डे " असतात. प्रत्येकाचा शेड्यूल हे डेज ठरवतात. प...
पुन्हा एकदा जागतिक महिला दिन आला. जगात कोणाला काहीच काम न उरल्यासारखे आजकाल हे " डे " असतात. प्रत्येकाचा शेड्यूल हे डेज ठरवतात. प्रपोज करण्यापासून किस करेपर्यंतच टाइमटेबल करून टाकलंय आणि आपण माणसंही मुर्खासारखी तेच फॉलो करत सुटलोय काय म्हणायचं याला ?
असो पण मूळ मुद्दा आहे तो महिला दिनाचा. आधीच काय कमी गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणीव करून देत असतात किंबहुना विसरू देत नसतात कि आपण महिला आहोत " माणूस " नाही. साधा उदाहरण घ्या ना रस्त्याने जाताना समोरून किंवा बाजूने जाणारा गर्दीच्या नावाखाली आपल्याला धक्का मारत स्पर्श करणार नाही ना यासाठी आपल्यातली " महिला " किती सतर्क असते. प्लाटफॉर्म वर ट्रेन येत असताना आपल्यातली " महिला " मागे सरकते एखादा पुरुषी हात चाटून जाईल नाहीतर मुद्दाम एखादा चालत्या गाडीतून उतरून हिरो सारखा तुमच्यातल्या " महिलेवर " आदळेल या भीतीने. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे आपण माणूस नसून फक्तं महिला आहोत हा विचार नकळत का होईना पण वाढीस लागतोय हि वस्तुस्थिती आहे.
खरं तर मला अजूनही कळलेलं नाही कि हा दिवस मी साजरा करावा बऱ्याचजणी करतात म्हणून किंवा कीव करावी अशा मला " वेगळं " काढणाऱ्या विचारधारेची ? पण तूर्तास मला असं वाटत कि मी माणूस म्हणून जन्माला आलेय आणि याचाच सन्मान केला जावा आणि माझी वागणूक , विचारसरणी , कृती यातून फक्तं तेच अधोरेखित व्हावा आणि हे एका दिवसापुरतं मर्यादित नसून ते माझं संपूर्ण आयुष्यं असेल.
---- © वैभवी भिडे

काल होळी आणि आज धुळवड गेले काही दिवस सगळीकडे पिचकाऱ्या आणि रंगांचा माहौल आहे. माझा रंगांवर जरा विशेष प्रेम आहे. बघावं तिकडे किती वेगवेगळ्या छटा दिसत असतात त्याही होळी नसताना कधी जरा लक्ष दिलं या निसर्गाच्या चमत्काराकडे तर लक्षात येतं त्याची नित्यनवी रंगपंचमी सुरु असते.
मी आज लिस्टच करायला घेतलीये माझ्या पाहण्यातल्या आणि आठवणीतल्या रंगांची.
नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचा थोडा लालसर रंग त्याच्या डोळ्यांचा रंग शोधताना आपल्या डोळ्यात दाटलेला औत्सुक्याचा रंग.
वेगवेगळ्या शाळांच्या युनिफॉर्मचा रंग , शाळा सुटल्यावर त्यांचा बदललेला आणि समस्त आई वर्गाच्या चिंतेचा ठरणारा तो रंग.
इतिहास , गणित, भूगोल वेगवेगळ्या पुस्तकांचा रंग , त्यांना घातलेल्या खाकी कव्हरचा तरीही प्रत्येकाचा वेगळा रंग .
नुकतीच माहिती कळलेल्या " फ्रेन्डशिप डे " चा आणि रिबीनचा म्हणजेच फ्रेन्डशिप बँडचा रंग.
कॉलेजमध्ये कळलेला " रोझ डेचा " रंग. सारी डे ला झळकणारा रंग , ट्रेडीशनल डे चा विविधतेत मिसळलेला रंग. रिझल्टचा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा रंग.
नोकरी लागली कि बॉसच्या मूड्सचा आणि कलीगचा बदलणारा रंग. मार्चएंड , एप्रिल , पगार , अप्रेजलचा रंग.
ट्रेनने प्रवास करताना प्रत्येक स्टेशनचा स्वतःचा असा खास रंग. सेन्ट्रल , वेस्टर्न , फर्स्ट क्लास , सेकंड क्लासचा रंग.
अचानक लवकर आल्यावर " डेलाईटचा " रोज असणारा पण आपल्याला क्वचित दिसणारा रंग.
तारेवर दिसणाऱ्या कावळे , कबुतरं , किंगफिशरचा रंग.
झाडावर भरणाऱ्या बगळ्यांच्या सभेचा रंग.
पहिल्या पावसाची चाहूल देणारा ढगांचा बदलता रंग. पाऊस यायच्या आधीचा उन्हाळ्याचा आंबा फणसाचा रंग. वाऱ्या पावसाचा धांदल उडवणारा रंग. हिवाळ्यातल्या स्वेटर , स्टोल आणि धुक्याचा रंग.
ट्रेकला गेल्यावर दिसणारा डोंगर माथ्यावरचा सुर्योदय , सूर्यास्ताचा भारून टाकणारा रंग. कड्याचा रंग. इतिहासाच्या उरलेल्या अवशेषांचा रंग. माणसांचा त्यांवर आपल्या खुणा खरडण्याचा मोहमयी रंग.
भरती ओहोटीचा रंग. वाळूचा , त्यात सापडणाऱ्या शंखं शिंपल्यांचा रंग. समुद्रात लांब दिसेनाशी होणाऱ्या बोटीचा रंग . विसर्जनाच्या निर्माल्याचा रंग. क्षणभंगुरतेचा विचार करत किनार्यावर रेंगाळलेल्या मनाचा रंग.
रंग कुठेही असतोच भिकाऱ्याच्या गाठोड्यात आणि एक दिवसापुरत्या दिल्या जाणाऱ्या ग्रीटिंग कार्ड मधेही. दिसू न शकणाऱ्या डोळ्यात तर रंगाच्या महत्वाचा रंग.
आयुष्यं असं एकदम कलरफुल आहे एकदा का आपण अशी लिस्ट अपडेट करायला शिकलो कि रंगपंचमीचं खरं सेलिब्रेशन सुरु होतं. होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा.

बुधवार, ४ मार्च, २०१५
आज चक्क एक महिला चालक असलेल्य रिक्षेमधुन प्रवास केला खूप कौतुक वाटल तिचं. अतिशय संयतपणे आणि आत्मविश्वासाने रिक्शा चालवणं बघुन महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ उलगडला. सगळीकडे निराशावादी घटना घडत असताना असे काही क्षण सकारात्मक उर्जा देतात आणि खर्या अर्थाने अक्षय तृतिया साजरी होते.
--- © वैभवी भिडे
(१ मे २०१४)
--- © वैभवी भिडे
(१ मे २०१४)
"उंच माझा झोका पुरस्कार वितरण सोहळा " बघतेय. छाती दडपून जाईल आणि आपलं आजवरचं आयुष्यं क्षुद्र वाटेल असं एकेका महिलांचं कार्य. असं आपणही जगावं, आपल्या आयुष्यालाही ' असण्याचं ' सदभाग्य लाभावं असं कायम मला वाटत राहिलंय. अर्थात हे असं वागण्याचं धाडस माझ्यात अजून तरी आलेलं नाहीये. कारण मुळात आपण आपल्या पलिकडे असलेलं काही बघत , स्वीकारत नाही. ८.३७ ची ट्रेन पकडून लेट मार्क लागू न देत ऑफिस मध्ये पोहोचणं हे आपला " गोल " असतं. या परिघा बाहेर पडून काम करणारी लोकं नेमकं कुठलं रसायन असतात ? आपल्यात ते १०० % नसेलही पण " माणूस " म्हणून त्यांचा काही अंश असणारच ना ? मग आपण किमान आपल्या पुरते तरी थोडं समंजसपणे , सुजाणपणे , सहनशीलपणे चांगुलपणाची कास धरत जगलो जगा आणि जगू द्या कृतीत उतरवलं तरीही एक एक करत प्रत्येकाचा आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचा झोका उंच का नाही झुलणार ?
तळटीप :- आपला मिडिया अशा सकारात्मक गोष्टी पुन्हा पुन्हा का नाही दाखवत कि जोवर परदेशात त्याची दखल घेतली जात नाही तोवर ती ब्रेकिंग न्यूज ठरणार नाही ?
--- © वैभवी भिडे
(२४ आॅगस्ट २०१४)

सालाबाद प्रमाणे २०१४ संपलं. पण का कुणास ठाऊक मला यंदा अजिबात " नॉस्टॅलजिक " वाटत नाहीये. असंही नाही कि या वर्षात काही घडलंच नाही किंवा धक्के बसलेच नाहीत . अगदी समूळ हादरवून सोडणारा " निर्भायाचा " लढा आपण सगळ्यांनीच पहिला. तिच्या जिद्दीला सलाम म्हणत असतानाच आपला माणूस म्हणून अधोगतीला जाणारा प्रवास डोळ्यांवरची झापडं काढणारा ठरला. भारतातील लोकांनी भ्रष्टाचारविरोधात एकवटून मोदींना निवडून दिलं. आणि अजूनही ठरवलं तर हा देश एकसंधपणे कोणालाही समूळ संपवू शकतो असा विश्वास देशभर निर्माण केला. अगदी वैयक्तिक पातळीवर माझाही प्रवास अल्लडतेतून किंचितसा का होईना पण प्रगल्भतेकडे सुरु झाला. सगळ्याच नाण्यांची दुसरी बाजू बघण्याचा व्यापक दृष्टीकोन माझ्यात वाढीस लागलाय आणि हे मला जाणवतंय. खोलवर सतत चालू असणाऱ्या माझ्या विचार मंथनातून उभारून येऊ पहात असलेली माझी सखी " कविता " आत्मिक पातळीवर मला सुखी समाधानी आणि समृद्ध करत चाललीये. अनेक नवेजुने बंध सैल होत होत माझ्यापासून सुटून गेले तर काहींची रेशीमगाठ दिवसागणिक पक्की होत गेली. आज सकाळी उठल्या उठल्या ओघानेच हे सुचत गेलं आणि मी ओरडले " युरेका " . मला माझी "स्वाभाविकता " सापडलीये आणि म्हणूनच कॅलेंडचं पान सहजपणे पलटाव तसंच २०१५ माझ्यासाठी सुरु होतंय सहजतेने.
---- © वैभवी भिडे
३० डिसेंबर २०१४
---- © वैभवी भिडे
३० डिसेंबर २०१४
आत्ताच " लोकमान्य एक युगपुरुष " चित्रपट आई सोबत जाऊन बघून आले. शो हाउसफुल बघून आणि प्रेक्षकवर्गात तरुणांची वाढलेली संख्या बघून सुरवातच समाधानाने झाली. आणि लोकमान्य टिळकांचे कार्य तर अद्वितीय आहे, येणाऱ्या प्रत्येक पिढीने कायम ज्यांचे ऋण स्मरावे अशी एक व्यक्ती. चित्रपटात त्यांचे कार्य जसे उसळू लागले तसेच माझे विचारही घरी येईपर्यंत " सेल्फ कंट्रोल " ने माझी परीक्षाच पहिली .
पहिल्यांदा मला ओम राउत यांचे आभार मानावेसे वाटले कारण गल्लाभरू अन आयटम सॉंग नी सडलेल्या चित्रपटांच्या घाणीत न बरबटता त्यांना कमळा चा विषय या क्षेत्रात येताना पदार्पणासाठी निवडला. कारण हे सगळे युगपुरुष आजकाल एकतर पुतळ्यापुरते आणि त्याला कोणी काळे फासले , चपलांचा हार घातला तर दंगल करून एकमेकांची मुंडकी कापण्यापुरते नाहीतर एखाद्या विशिष्ट जाती धर्मा पुरतेच उरलेत. आणि आपली सद्यस्थिती पहाता या सगळ्यांचे कार्य आजच्या आणि येणाऱ्या पिढी समोर दृकश्राव्य माध्यमातून आणणे गरजेचे झाले आहे.
चित्रपट बघताना फुले , सावरकर , चापेकर, आगरकर, स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय , खुदिराम बोस , बिपिनचंद्र पाल यांसारख्या व्यक्तींचा एकमेकांशी असलेला ऋणानुबंध यांचा ओझरता मिलाफ पहाता आला आणि विचार आला " आपला देश स्वतंत्र हवा " या एका ध्येयाने पछाडलेली माणसे म्हणजे अविनाशी एक आत्मा आणि चेहरे वेगळे. आपल्यात असलेला हा अंश आपणही ओळखू शकलो तर ?
असं नाहीये कि मी इतिहास वाचलाच नाहीये किंवा टिळकांचं कार्य मला माहितीच नाहीये पण रोजच्या आयुष्यात जे विसरलेले ते आज पुन्हा माझ्या समोर आलं आणि नेहमी प्रमाणेच मला यातूनह खजिना हाती लागला तो म्हणजे " स्वतःच्या वेडेपणा वरचा विश्वास ". जेव्हा आपण एकटेच काही चांगले काम करण्यासाठी धडपडत असते , चुकीच्या गोष्टींना चूक म्हणायचा धाडस करते , बदलाची सुरुवात स्वतःपासून करते आणि इतरांनाही करायला सांगते तेव्हा मला ऐकू येतात इतरांचे कुत्सित सूर आणि जगाच्या नजरेत दिसतं वाक्यं " काय वेडबिड लागलंय का ? " आणि कुठेतरी आपण चूक तर नाही अशी शंका येऊ लागते. त्याचवेळी असे दीपस्तंभ समोर आले कि मग कळते " आपलं असं वेडं असणंच आपल्या शहाणपणाचं लक्षण आहे. "
---- © वैभवी भिडे.
३ जानेवरी २०१५

समोरचा कित्येकदा हे विसरून जातो की प्रत्येक व्यक्ती हे वेगळं व्यक्तिमत्व आहे तिचं स्वतःचा असं एक आयुष्य आहे आणि ते त्या व्यक्तीला निसर्गानेच किंवा नियतीने जगण्याचा हक्कं दिलेला आहे. सल्ला जरूर द्या कळकळ वाटते म्हणून , त्या विषयातील ज्ञान आहे म्हणून नाहीतर तो दिल्याशिवाय रहावत नाही म्हणून. पण त्याच सल्लाबरहुकुम वागलं पाहिजे असा हट्ट धरून एखादा बसला तर तीही एक प्रकारची बळजबरी असते.तुम्ही नकळत हुकुमशाहाच्या भूमिकेत शिरत असून दुसऱ्याला गुलाम ठरवत आहात हे लक्षात घ्या. एखादा अडचणीत सापडला कि मदत करणे तर दूरच पण स्वतःचा अहं सुखावण्यासाठी स्वतःला जो पटेल तो सल्ला द्यायचा अन देताना समोरच्याचा विचारही करायचा नाही वर त्या व्यक्तीने तो सल्ला मानलाच पाहिजे कारण ज्या अर्थी तो अडचणीत आहे त्या अर्थी तो चूक आहे आणि केवळ नशिबाने तुमच्या आयुष्यात आत्ता काही अडचण नाही म्हणून तुम्ही बरोबर हे ठरविण्याचा अधिकार कुठून प्राप्त होतो हे मला तरी न उलगडणारं कोडं आहे . अर्थात शक्तिमान लोक वर्चस्व गाजवतात हाही जगाचा एक नियम आहे आणि कोणाच्याही सक्तीपुढे मान न तुकवता आपल्या मनाला जे योग्य वाटेल बुद्धीला पटेल तसंच वागणं हे माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे. इतरांबाबतची कित्येक कर्तव्यं आपण नाईलाजास्तव पूर्ण करतो मग स्वतःसाठी एखादं कर्तव्यं पार पाडायला काय हरकत आहे ? कधीतरी ( खऱ्या अर्थाने ) " स्वार्थी " व्हावंच लागतं. या जगात जगायचं असेल तर हाही एक नियम आहे.
---- © वैभवी भिडे
१० जानेवारी २०१५
सगळं असं तुकडयातुकडयात घडतंय तरीही संदर्भहीन.
सगळ्याचा क्रम लावायला जातो तेव्हा लक्षात येतं कि यातल्या कुठल्याही दोन तुकड्यात सुसूत्रता नाहीये. मग हे असंच विखुरलेलं ठेवून द्यायचं कि एखाद्या बोचक्यात बांधायचं? म्हणजे पुन्हा मूळ प्रश्नं कायम करायचं तर नेमकं काय करायचं ? कशाचीच टोटल लागत नाहीये. कि प्रत्येकाचा असा एक स्वतंत्र अर्थ आहे एकमेकात न मिसळणारा आणि आपल्याला तर सवय असते ना प्रत्येकाला एखादा रंग , वास , नाव , चव बहाल करण्याची. त्या पलिकडचं काही आला कि मग नुसता गोंधळ उडतो. असं होऊच कसं शकतं इथून सुरु झालेला प्रवास आता काय करायचं वर येउन ठेपतो आणि तरीही आपल्याला हे स्टेशन कुठलय माहित नसतं. मग कधी चिडचिड , हतबलता , त्रागा , हताशपणा आणि सरते शेवटी एक अबोल शांतता हो कारण एरवीच्या शांतातेलाही बरेच आवाज असतात स्वतःचे असे संदर्भ असतात पण हि शांतता मात्र अबोल अगदी मूक म्हणा ना कारण तीच मुळात शोधात असते स्वतःच्या आवाजाच्या. तो तिचा आवाज तिला मिळेस्तोवर सगळं अस्तित्व असंच विखुरलेलं राहणार अर्थात हे कोणी सांगू शकत नाही कि सगळ्याचा अर्थ एकसंधच असेल कदाचित प्रत्येक तुकडा एक नविन आवाज असू शकेल एकाच अर्थाचा.
--- © वैभवी भिडे.
( १९ फेब्रुवारी २०१५ )

एखादा क्षण पुरेसा असतो आपल्या मनाचा तळ ढवळून काढायला आणि या मंथनातून कितीक आणि कसले अवशेष बाहेर येतील सांगू शकत नाही. तशी मी सहसा हळवी होत नाही पण जेव्हा मला माझ्या आजी नानांची आठवण येते तेव्हा ना मला या माझ्या कणखर इमेजची चौकट अडवू शकते ना कुठल्या जगाची पर्वा. " माझे नातेवाईक " असं ज्यांना मी हक्काने म्हणू शकेन अशा या दोनच व्यक्ती होत्या ( बाकी रक्ताचा एखादा भाग सारखा म्हणून नाईलाजाने लादले गेलेलेच जास्ती ). म्हणून तर शेवटच्या क्षणात जेव्हा आजी माणसांना ओळखत नव्हती, तेव्हा तिने कधीच मला ज्या वेशात पहिला नव्हता अशा जीन्स अन शर्ट पेहारावातही " अरे ही तर आमची वैभवी " हे तिच्या तोंडून ऐकताना माझी मन ताठ झालेली ती बुकर किंवा ज्ञानपीठ पुरस्कार मला कोणी जाहीर केला तरी होऊ शकणार नाही.
निमित्त झालं ते एका मित्राला आजी गेल्याची तारीख मी चुकीची सांगितल्याचं अर्थात त्याही दिवशी मी ते विसरलेलेच आणि मग लक्षात आलं मी बरंच काही विसरले आहे. त्या दोघांची आवडनिवड , रंग , पदार्थ काही म्हणून काही आठवत नाहीये मला.
एकदा हातावर मेंदी काढलेली म्हणून आजीने भरवलेली मुगाची खिचडी ती चव मी एकदाही माझ्या खिचडीत उतरवू शकले नाहीये हे लक्षात आहे माझ्या. किंवा नानांना "आताशा तुम्ही पत्रं का लिहीत नाही ?"म्हणून खुपदा झापल्याचं आठवतंय. माझी सुरवातीला लिहिलेली कविता त्यांनी आपटे कुलांच्या मासिकात छापून आणलेली " माझ्या नातीची इयत्ता १० वीत केलेली कविता ".
ते असताना आपण किती गृहीत धरून चालतो कि ते असेच रहणारेत कायम आपल्यासाठी आणि मग एखाद दिवस अचानक आपला स्पर्श करून देतो त्यांच्या थंड पडलेल्या कलेवराला आणि आपला काळही गोठून जातो त्या एका क्षणात.
मग अजून काही क्षण येतात एखादी चिमुरडी आजी सोबत महादेवाला पाणी घालायला जाताना दिसते किंवा आजोबांच्या मांडीत बसून अथर्वशीर्ष म्हणताना ऐकू येते आणि जाणवतं क्षण कायम प्रवाही असतात पिढ्यानपिढ्या फक्त त्यातले माणसांचे संदर्भ बदलतात. मग अशा या चिरंतन चक्राचे आपण सदस्य आहोत जाणवल्यावर तारखांचे दाखले घेऊन आठवणी येत नाही आणि मनातला हळवा कोपरा आपल्यापुरता मर्यादित रहात नाही.
---- © वैभवी भिडे.
( २४ फेब्रुवारी २०१५ )
( २४ फेब्रुवारी २०१५ )
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)